Last updated on September 24th, 2025 at 09:17 pm
मराठी सिनेविश्वात असे अनेक नवोदित कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बरेचदा या कलाकारांची पहिलीच एंट्री अनेकांना भावते. आजही ही आपली मराठी इंडस्ट्री अनेक नव्या चेहऱ्यांना मोठं होण्याची संधी देते. अर्थात आपल्या इंडस्ट्रीची ही बाब वाखाणण्याजोगी आहे.
अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एंट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी सावंत. सध्या चर्चेत असलेल्या ‘आरपार’ या चित्रपटातून जान्हवीने सिनेविश्वात पदार्पण केलंय.
‘आरपार’ चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरसह चित्रपटातील इतरही कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची वाढविलीये. दरम्यान, चित्रपटात झळकलेल्या नव्या चेहऱ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ही नवी अभिनेत्री नक्की कोण? असा प्रश्नही साऱ्यांना पडला. तर अभिनेत्री जान्हवी सावंत हिने ‘आरपार’ सिनेमातून सिनेविश्वात एंट्री केली.

जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांना अधिक भावली. अभिनेत्री जान्हवी सावंत हिने हा प्रवास आता ‘आरपार’ या सिनेमातून सुरू केलाय. या चित्रपटात तिने ललितची होणारी पत्नी ही भूमिका साकारली, मात्र ही भूमिका चित्रपटात ट्विस्ट येताच दूर गेली. तिची भूमिका, तिचा अभिनय, तिचे व्यक्तिसौंदर्य सारे काही प्रेक्षकांना भावले आणि ‘आरपार’मुळे जान्हवीला विशेष प्रेम मिळाले. नवोदित अभिनेत्री म्हणून जान्हवीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय.
एकूणच या प्रवासाबाबत जान्हवी म्हणाली, ‘आरपार’मुळे मला सिने इंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली, याबाबत मी साऱ्यांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली, हे माझं भाग्यच म्हणायला हवं. ‘आरपार’ चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने सिनेविश्वातील मार्ग मोकळे करून दिले आहेत. आता आणखी बऱ्याच प्रोजेक्ट्सवर काम करायचंय आणि त्यासाठी मी उत्सुक आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
