डी. रंधावा, गुरलीन चोप्राने लाँच केली सीडब्ल्यूजीची उत्पादने

प्रसिद्ध अभिनेत्री गुरलीन चोप्रा, जी प्रसिद्ध फिटनेस कोचही आहे, तिने काऊंसलिंग द्वारा लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. तिने आता डी. रंधावा याच्यासोबत स्कीनकेयरमधला आपला स्वत:चा एक नवा ब्युटी ब्रँड “सीडब्ल्यूजी” (कॉन्फिडेंस विथ ग्रेस) लाँच केलाय. हा ब्रँड पिगमेंटेशन, चेहऱ्यावरील लव आणि मुरुमांवर नैसर्गिक औषध आहे. कारण या उत्पादनांमध्ये फेस वॉश, सीरम आणि सनस्क्रीन क्रीम यांचा समावेश आहे. गुरलीन चोप्रा “काऊंसलिंग विथ ग्रेस”च्या माध्यमातून लोकांना आरोग्य आणि त्वचेच्या रक्षणाबाबत सांगते. या लाँच कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार डबू मलिक प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते, ज्यांनी डी. रंधावा आणि गुरलीन चोप्रा यांना त्यांच्या नव्या उत्पादनांसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या.

गुरलीन चोप्रा म्हणाली, आपल्या त्वचेवर दररोज प्रदूषण, उकाडा आणि ताणतणाव यांचा परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निर्जीव होते. म्हणूनच फेसवॉशनंतर माझ्या मते तुम्ही सीडब्ल्यूजी ह्यालुरोनिक अॅसिड रेडियन्स सीरमचे चार ते पाच थेंब लावावेत. यामुळे तुमची त्वचा लगेच मुलायम, हाइड्रेटेड आण् चमकदार झाल्याचे तुम्हाला जाणवेल. या सीरमचा वापर दिवसातून दोनदा करायला हवा. एकदा सकाळी चेहरा धुतल्यावर आणि दुसऱ्यांदा रात्री झोपण्यापूर्वी.”

डी. रंधावाने म्हटले, स्कीनकेयरची ही उत्पादने गुरलीन आणि मी, दोघांनीही मोठ्या प्रेमाने बनवली आहेत. सीडब्ल्यूजी ब्रँडमधल्या फेसवॉशपासून सनस्क्रीन, डे अँड नाइट सीरमपर्यंत, प्रत्येकावर आम्ही खूप रिसर्च केला आहे. अनेक प्रयोग करण्यात आलेत. त्यामुळे प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी ती चांगली आहेत. तुम्ही पिंपल्स, ब्लॅकहेड्स वा निर्जिव त्वचा अशा कुठल्याही समस्येने त्रस्त असलात तरी आमच्या या कॉम्बिनेशन ट्रीटमेंटमुळे तुमची त्वचा कोमल होणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *