
अभिनेत्री गिरिजा ओक हे नाव सध्या ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत आहे. मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटीवरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेली गिरिजा आता “न्यू नॅशनल क्रश” होताना दिसतेय. तिचे सौंदर्य आणि अभिनयशैली तसेच व्यक्तिमत्त्व चाहत्यांना वेड लावतंय. यामुळे सध्या तिला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ही पदवी मिळालीय. तिची साधी आणि आकर्षक छबी तरुणाईला भुरळ घालतेय.

इंटरनेटवर कोणीही एका रात्रीत सेन्सेशन बनू शकते आणि आता निळ्या साडीतील एक महिला चर्चेत आहे. अनेक लोक ती कोण आहे हे जाणून घेण्यास उत्सुक होते आणि खरं तर अनेक यूजर्सनी हा फोटो पोस्ट केला आणि ती कोण आहे आणि ती का ट्रेंड करत आहे असे विचारले. त्यानंतर यूजर्सनी सोशल मीडिया वर चौकशी सुरू केली. तेव्हा कळले की ती दुसरी तिसरी कोणतीही अभिनेत्री नसून गिरिजा ओक आहे. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्येही गिरिजाने आजवर काम केलेय.

गिरिजाचा निळ्या रंगाच्या साडीमधला फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. प्रेक्षक, फॅन्स यांनी ती न्यू नॅशनल क्रश आहे असंही जाहीरपणे सांगितलं आहे. तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोजने तिने प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतलं आहे. येणाऱ्या काळात गिरिजा नक्कीच काहीतरी खास घेऊन येणार यात शंका नाही!

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
