शब्बीर-कांचीच्या संसारात सोनाली बेंद्रेचा खोडा!

कलर्स वाहिनीवरील ‘धमाल विथ पती पत्नी और पंगा – जोडियों का रिअलिटी चेक’ या शोमध्ये सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्याची अनोखी परीक्षा पाहायला मिळत आहे. अभिनेता शब्बीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल यांनी आतापर्यंत प्रत्येक कसोटीवर उत्तम कामगिरी करत आपल्या नात्यातील समजूतदारपणा आणि परस्परांमधील उत्तम केमिस्ट्री सिद्ध केली आहे. प्रत्येक रिअलिटी चेकमध्ये परिपूर्ण गुण मिळवणाऱ्या या जोडीच्या संसारात आता शोची सूत्रसंचालक सोनाली बेंद्रे बेहल खोडा घालणार का, याची उत्सुकता आहे.

शब्बीर आणि कांची यांचे नाते इतके सहज आणि समजुतीवर आधारित दिसते की, त्यांच्या संसारात वादाला जागाच नसल्याचे चित्र आहे. मात्र, या परफेक्ट जोडीच्या नात्यात एखादा ‘पंगा’ शोधण्याचा निर्धार सोनालीने केला आहे. तिच्या अनपेक्षित युक्त्या आणि ट्विस्टमुळे या जोडीचे नवे पैलू समोर येणार की शब्बीर-कांचीची केमिस्ट्री प्रत्येक आव्हानावर मात करणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

याविषयी बोलताना शब्बीर अहलुवालिया म्हणाला, “कांची आणि माझ्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता अनेकदा आमचे विचार एकसारखे असतात. कधीकधी तर आम्ही एकमेकांच्या मनातले विचारही ओळखतो. काही वेळा आम्ही एकाच वेळी अगदी तेच बोलतो किंवा समोरच्याला काय वाटत आहे, हे न सांगताही समजते. कालांतराने अशी समजूतदारपणा निर्माण होतो आणि त्याचे प्रतिबिंब शोमधील आमच्या नात्यातही दिसते.

“इतर जोडप्यांप्रमाणे आमच्यातही मतभेद होतात; पण आम्ही एकमेकांना समजून घ्यायला, छोट्या गोष्टींवर हसायला आणि प्रत्येक मतभेदाचे मोठ्या वादात रूपांतर होऊ न द्यायला शिकलो आहोत. आमच्या नात्यात पंगा कसा आणायचा, याचे रहस्य अद्याप कोणालाही सापडलेले नाही! आता सोनाली आमच्या नात्यात काही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने ती यात यशस्वी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. एकत्र वेळ घालवणे, मनमोकळेपणाने हसणे आणि स्वतःला फार गंभीरपणे न घेणे, हेच आमच्या नात्याचे रहस्य आहे. मात्र, या शोमध्ये अनपेक्षित क्षणी पंगा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.”

‘निव्हिया बॉडी मिल्क’ आणि ‘ORN.com’ प्रस्तुत, ‘एन्वी परफ्यूम’ फ्रॅग्रन्स पार्टनर, ‘सिल्व्हर कॉइन चक्की फ्रेश आटा’ कुकिंग पार्टनर आणि ‘कॅडबरी सिल्क’ स्पेशल पार्टनर असलेला ‘धमाल विथ पती पत्नी और पंगा – जोडियों का रिअॅलिटी चेक’ हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता कलर्स वाहिनी आणि जीओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *