आमीर-उर्मिलाचा “रंगीला” पुन्हा येणार

काही चित्रपट मनात घर करून राहिलेले असतात. आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल ३० वर्षांपूर्वी आलेला ‘रंगीला’ हा सिनेमाही असाच… आजच्या काळात आणि आजच्या प्रगत सिने तंत्रज्ञानात म्हणजे फोर-के फॉरमॅटमध्ये हा सिनेमा पाहता येण्याची संधी आली आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहांच्या मोठ्या पडद्यावर फोर-के रिस्टोर्ड वर्जनमध्ये पुन्हा पाहता येणार आहे.

या नव्या रिस्टोर्ड वर्जनमध्ये उत्कृष्ट रिजॉल्यूशन, ज्यास्त शार्पनेस आणि अद्भुत इमेज क्वालिटी तर असेलच, पण त्याबरोबरच इमर्सिव साऊंडचाही अनुभव घेता येणार आहे. अल्ट्रा मीडिया द्वारा त्यांच्या विशेष “अल्ट्रा रिवाइंड” इनिशिएटिव अंतर्गत हा सिनेमा रिस्टोर करण्यात आला असून नव्या रुपात तो सिनेमागृहात पाहायला नक्कीच मजा येईल.

राम गोपाल वर्मा यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगीला’ हा सिनेमा ताजे टवटवीत कथानक, ए. आर. रहमान यांचे अविस्मरणीय संगीत आणि स्टायलिश फिल्मांकनामुळे आजही मील का पत्थर मानला जातो. संगीत, ग्लॅमर आणि भावनांचा संगम यामुळे या सिनेमाने 1990च्या दशकात नव्या युगाची सुरुवात केली होती. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा म्हणाले, त्या काळात लोकांच्या भावना काय होत्या ते ‘रंगीला’ने दाखवले होते. माणूस सामान्य असला तरी त्याची स्वप्ने मोठी असू शकतात, हे या सिनेमाने सिद्ध करून दाखवले होते. प्रस्थापित नियम तोडणारा हा सिनेमा म्हणूनच अविस्मरणीय ठरला, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

अल्ट्रा रिवाइंड अल्ट्रा मीडिया ग्रुपचा ‘रंगीला’ हा रीरिलीजचा हा दुसरा प्रकल्प आहे. यापूर्वी याच वर्षी ८ जुलैला त्यांनी गुरुदत्त यांचे प्यासा, साहब बीवी और गुलाम, कागज के फूल, आरपार, चौदहवीं का चाँद, मिस्टर एंड मिसेज 55 और बाज हे चित्रपट फोर-के रिस्टोर्ड फॉर्मेटमध्ये आणले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *