‘आशिकी’ गर्लचा ड्रेसिंग सेन्स होतोय ट्रोल

साधीभोळी मुलगी म्हणून ‘आशिकी’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेत्री अनू अग्रवाल हिचे चाहते प्रचंड संख्येने होते. पण काळ बदलला, लोक बदलले आणि चाहतेही बदलले. हेच चाहते आता भाबड्या अनू अग्रवालच्या ड्रेसिंग सेन्सला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर ते तिच्यावर हसू लागले आहेत.

बॉलिवुडमध्ये आयकॉनिक ठरलेल्या ‘आशिकी’ या सिनेमाद्वारे अनू अग्रवाल रातोरात स्टार बनली होती. पण आता तिचा अभिनय नाही, तर ड्रेसिंग सेन्स हसण्याचा विषय ठरला आहे. ती सध्या काही इव्हेंट्स आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर येते तेव्हा लोक तिचा पेहराव, तिचा लुक पाहून चकीत होतात. पण पूर्वी अनू जशी साधीभोळी होती, तशीच ती आताही भोळीभाबडीच आहे. तिला जे पटते ते ती मनापासून करते हेच तिच्या वागण्यावरून दिसते. आता तिला ड्रेस कसा असावा हे कुणी सांगत नसेल तर ती तरी काय करेल बिचारी…

आताही इन्स्टाग्रामवर तिचा लुक वायरल झाला आहे. त्यात 56 वर्षांच्या अनू अग्रवालने केवळ वरचा टॉपच परिधान केला आहे. त्याखाली कुठलाच पेयर तिने घातलेला नाही. या तिच्या भाबडेपणाला नेटकरी ट्रोल करायला लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *