अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो”ने जिंकली प्रेक्षकांची मने!

Last updated on September 26th, 2025 at 09:07 pm





बिग बॉस, इंडियन आयडॉल ते अगदी संगीत विश्वात सगळ्यांची मन जिंकळणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे त्याचा नवरात्री स्पेशल गाण्यामुळे! नुकतंच अभिजीतने संगीतबद्ध आणि जादू आवाजात गायलेलं ‘प्रेमरंग सनेडो गे’ हे गाणं नुकतंच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता हे गाणं सगळीकडे ट्रेंड होताना दिसतंय. फक्त सोशल मीडियावर नव्हे तर अगदी रास दांडियाच्या कार्यक्रमातही हे गाणं ट्रेंडिंग ठरतंय.

अभिजीत सावंतने आजवर अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत आणि त्याच्या गाण्याची जादू ही कायम बघायला मिळते. संगीत विश्वात गेली 20 वर्षे वैविध्यपूर्ण शैलीने त्याने गाण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवला आहे.

‘प्रेमरंग सनेडो’ हे गाणं गुजराती आणि मराठी गाण्याचं मिक्सटेप असलं तरी त्याचा फॅन्सने या गाण्यावर अगणित रील्सदेखील सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत. अभिजीतने पहिल्यांदाच गुजराती गाण्याचा हा प्रयोग यातून केला असला, तरी रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलाय.

येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स आणि त्यातून वैविध्यपूर्ण गाण्याची निर्मिती करणार असल्याचं कळतंय. सध्या ट्रेंडीग गाणी आणि अभिजीत सावंत हे समीकरण पक्क ठरतंय यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *