अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर आज ‘भय – द गौरव तिवारी मिस्ट्री’ ही नवीन वेबसीरिज सुरू झाली. भारतात सर्वप्रथम पॅरानॉर्मल गोष्टींचा शोध गौरव तिवारी यांनी घेतला होता. या सीरिजमध्ये त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याशी संबंधित वास्तविक घटना दाखवल्या जाणार आहेत. या मालिकेत करण टॅकर याने गौरव तिवारी यांची आणि कल्की कोचलिन हिने आयरीन वेंकट यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच यात दानिश सूद, सलोनी बत्रा, शुभम चौधरी आणि निमिषा नायर यांच्याही भूमिका पाहायला मिळतील. या सीरिजचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले असून ती अज्ञात गोष्टींचा शोध घेणार आहे.

नुकताच या सीरिजचा ट्रेलर दाखल झाला. ट्रेलरची सुरुवात एका तणावपूर्ण जागेवरील शोध घेण्याने होते, जी प्रेक्षकांना गौरव यांनी कधीतरी अनुभवलेल्या जगात थेट घेऊन जाते. अस्पष्ट हालचालींची लुकलुक, संकटात केलेले कॉल्स, बॅटऱ्या संपणे, अवतीभोवती आत्मा फिरणे, आणि विरोधाभासी कथा या गोष्टी त्यांनी पायलट म्हणून सुरु केलेला प्रवास आणि ते इंग्लंडमधील तत्वज्ञानविषयक चर्चकडे आकर्षित होऊन अखेरीस भारताचे पहिले पॅरानॉर्मल अधिकारी बनले. असा जीवन बदलणारा अनुभव एकत्र दाखवितात. कथेत त्यांनी केलेले संघर्ष पहायला मिळतात. यासोबतच आयरीन वेंकट यांचा कथेचा प्रवास सुरू होतो, जी भूमिका कल्की कोचलिनने साकारली आहे.

गौरव तिवारी यांची भूमिका साकारण्याबाबत करण टॅकर म्हणाला, “आपण आपल्या समजाच्या पलीकडील शक्तींना तोंड देत आहोत, असे खरोखर मानणाऱ्या आणि धक्कादायक परिस्थितींमध्ये या जगाचा दु:खदरित्या निरोप घेणाऱ्या व्यक्तीची भूमिका मला यात साकारायची होती. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून आजपर्यंतचा सर्वात कठीण अनुभव लाभलेला आहे. मला आनंद आहे की मला भारताच्या पहिल्या पॅरानॉर्मल शोध घेणाऱ्याची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली.”
आयरीन वेंकटची भूमिका साकारणारी कल्की कोचलिन म्हणाली, “आयरीनचा प्रवास हा समजुतीच्या पलीकडे पाहण्याबद्दल आहे. सुरुवातीला तिच्या मनात शंका असते, परंतु गौरवच्या निधनानंतर जेव्हा तिला त्यांच्याबद्दल कळते तेव्हा तिला त्या अनेक स्तरांची जाणीव होते जे त्यांच्या जीवनाचा आणि कामाचा भाग होते. मला या भूमिकेकडे आकर्षित करणारा एक प्रमुख घटक म्हणजे तो भावनिक बदल होता. जिज्ञासा आणि असुरक्षिततेतील संतुलनाचा शोध मला आयरीन भूमिका साकारताना घेता आला आणि तो पडद्यावर सादर करणे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.”

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
