‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये विनोदाचा बोनस डोस… | Maharashtrachi Hasya Jatra – Sony Marathi

Maharashtrachi Hasya Jatra Diwali Dhamaka 2025

Last updated on September 27th, 2025 at 06:40 pm

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमानं केवळ महाराष्ट्रातल्याच नाही, तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत, ज्यात अनेक नामवंत कलाकारही आहेत. म्हणूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आता ‘विनोदाचा बोनस’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न “महाराष्ट्राची हास्यजत्रा”च्या टीमचा असतो. या नवीन सिझनमध्येही प्रेक्षकांचा ताण कमी करून विनोदाची हमी देणारे नावीन्यपूर्ण विषय घेऊन टीम सज्ज आहे. हा नवीन सिझन ७ सप्टेंबरपासून रविवार ते बुधवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतो.


समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ईशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनीता खरात, अरुण कदम, रसिका वेंगुर्लेकर, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, ओंकार राऊत आणि पृथ्वीक प्रताप या तुफान कलाकारांनी रंगवलेल्या विविध पात्रांवर प्रेक्षकांनी आजवर प्रेम केलंय. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कलाकार पुन्हा एकदा नव्या जोमानं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. महाराष्ट्राची लाडकी निवेदिका प्राजक्ता माळी नि हास्यरसिक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांचीही साथ आहेच.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *