डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिशा दिली ती केवळ विचारांनी नाही तर कृतीने. त्यांनी अनुभवलेलं दुःख, अन्याय भेदभावच पुढे त्यांच्या प्रेरणेचं सामर्थ्य बनलं. मात्र आजकाल समाजात त्यांचे विचार कुठेतरी पुसले जात आहेत असे दिसते. त्यांच्या या विचारांची उजळणी आता ‘माणूस नावाचं वादळ’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर होणार आहे. येत्या २ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘माणूस नावाचं वादळ’ या चित्रपटात प्रशांत विलास सोनावणे, प्रीती वऱ्हाडे, प्रमोद सुर्वे, परेश मोरे, चंद्रकांत सावंत, दर्शना मोहिते, राजकुमार सावंत, विकास सूर्यवंशी, तुषार मिलिंद, साक्षी कदम, रूही जाधव, शर्वरी, उदयभान भारती, वैशाली जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
प्रशांत विलास सोनावणे याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. प्रशांत सोनावणे यांनी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी धुरा सांभाळली आहे, तर विलास सोनावणे, पुरुषोत्तम वेल्हे यांनी लेखन केले आहे. संगीत जबाबदारी विशाल पाटील, केदार पानसरे, यशोधन बापट यांचे आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
