दुर्गे दुर्घट भारी – पुन्हा शिवाजी राजे भोसले मराठी चित्रपट | Durge Durghat Bhari – Punha Shivaji Raje Bhosale 2025

Durge Durghat Bhari - Punha Shivaji Raje Bhosale

Last updated on September 27th, 2025 at 06:41 pm

‘’पुन्हा शिवाजी राजे भोसले’’ या चित्रपटातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा, नवचैतन्याचा संचार करून देतंय. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची नवी छटा देत हे गीत महाराष्ट्रभर गुंजतेय. या गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रथमच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या आराधनागीताला वेगळाच आविष्कार दिला आहे.


या गीताला शंकर महादेवन यांच्या प्रभावी आणि दैवी आवाजाची साथ लाभली असून ढोलताशांचा दणदणाट (वरद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, रुल सावंत) देवीच्या जयघोषाची अनुभूती देतो. आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गाण्याला भव्यता दिली आहे. याशिवाय यशराज स्टुडिओमधील विजय दयाल यांच्या मिक्सिंग आणि मास्टरिंगमुळे गीत अधिक प्रभावी बनलंय.


‘दुर्गे दुर्घट भारी’ हे केवळ एक गाणं नसून देवीच्या आराधनेतून निर्माण होणारा भक्तिरसाचा झरा आहे, असं महेश मांजरेकर सांगतात. सध्या हे गीत घराघरात, मनामनात भक्तीचा आणि ऊर्जेचा जयघोष घुमवत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *