गीतांजली मिश्राने घेतला आध्यात्मिकतेचा अनुभव!

Last updated on October 25th, 2025 at 09:39 pm

अॅण्‍ड टीव्‍हीवरील ‘हप्‍पू की उलटन पलटन’ या कॉमेडी मालिकेत उत्‍साही राजेशची भूमिका साकारणारी अभिनेत्री गीतांजली मिश्रा भगवान शिवावरील भक्‍तीसाठीही प्रसिद्ध आहे. गीतांजली हिची भगवान शिवावर दृढ निष्‍ठा आहे. आपली ताकद, शांत स्‍वभाव आणि सर्जनशीलतेचे श्रेय ती भोलेनाथाच्‍या आशीर्वादाला देतात. नुकतेच तिने व्‍यस्‍त शूटिंग वेळापत्रकामधून वेळ काढत आध्‍यात्मिकतेचा अनुभव घेतला. तिने उज्‍जैनमधील भगवान शिवाच्‍या मंदिरांपैकी एक असलेल्या पवित्र महाकालेश्वर ज्‍योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.
आपल्‍या दैवी प्रवासाबाबत गीतांजली म्हणते, ”मी उज्‍जैनमध्‍ये येताच मला वातावरणामध्‍ये अद्वितीय दैवी ऊर्जा जाणवली. भक्‍तीमय उत्‍साह, सर्वत्र ‘हर हर महादेव’चा जयघोष आणि महाकाल मंदिरामधील आध्‍यात्मिक वातावरणाने मला शांतमय अनुभव दिला. सायंकाळी आरतीदरम्यान शिवलिंगासमोर उभे राहण्‍याचा, तसेच आसपास उपस्थित हजारो भक्‍तांना पाहण्‍याचा अनुभव भावनामय होता. या दैवी वातावरणामुळे माझे मन प्रसन्‍न झाले.”
ती पुढे सांगते, ”मी भगवान शंकराच्‍या मंदिरामध्‍ये जाते तेव्‍हा मानसिकदृष्‍ट्या, भावनिकदृष्‍ट्या व आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उत्‍साहित होते. महाकालची उपस्थिती शक्तिशाली असण्‍यासोबत दयाळू आहे. मी माझे कुटुंब, मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ची संपूर्ण टीम आणि आमच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्‍यांसाठी प्रार्थना केली.”
महाकालचा आशीर्वाद घेतल्‍यानंतर गीतांजली उज्‍जैनच्‍या उत्‍साही वातावरणामध्‍ये भारावून गेली. ती म्हणते, ”या शहरातील प्रसिद्ध पोहा-जिलेबी ब्रेकफास्‍टचा, तसेच बाजारपेठांमधील डाळ बाफ्ताचा आस्‍वाद घेण्‍यासह मी प्रत्‍येक स्‍थानिक स्‍वादाचाही आस्‍वाद घेतला. मी सूर्यास्‍ताच्‍या वेळी रामघाटवर फिरण्‍याचा, पवित्र शिप्रा नदीवर चमकणाऱ्या प्रतिबिंबांना पाहण्‍याचा आनंद घेतला, जो निर्मळ चिंतन व कृतज्ञतेचा क्षण ठरला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *