नृत्यांगना अभिनेत्री संस्कृती बालगुडे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच एक सुंदर मनमोहक लूक आणि नवाकोरा प्रोजेक्ट्स घेऊन येणार असून “संभवामि युगे युगे”मध्ये ती श्रीकृष्णाच्या अवतारात दिसणार आहे. हा एक डान्स ड्रामा असला तरी तो तिच्या जीवाच्या अगदी जवळचा प्रोजेक्ट आहे असं तिने या आधी सांगितलं होत.

भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत असलेला संस्कृतीचा लुक प्रेमात पाडणारा आहे. कृष्णाच्या गोष्टी ती यामधून उलगडताना दिसणार आहे. संस्कृती आजवर अनेक मुलाखतीमध्ये श्रीकृष्णाबद्दलच्या तिच्या खास नात्यावर बोलताना दिसली आहे.
तिच्या कृष्णरुपी लुकचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केल्यानंतर आज तिने कृष्ण रुपातला अजून एक मनमोहक फोटो पोस्ट करून त्याला खास कॅप्शन दिलीय. ती म्हणतेय, “मंचावर कृष्णाला साकारण्याची संधी मिळतेय यापेक्षा मोठं भाग्य आणखी काय?” आयुष्यात एवढं छान आणि सुंदर पात्र साकारण्याची या निमित्तानं संधी तिला मिळाली असून प्रेक्षकांमध्ये “संभवामि युगे युगे”ची उत्सुकता बघायला मिळतेय.

“संभवामि युगे युगे”च्या निमित्तानं अभिनेत्री संस्कृती बालगुडेची दोन स्वप्न पूर्ण होताना बघायला मिळतात. एक म्हणजे तिचं कृष्ण रुपात येऊन प्रेक्षकांना काहीतरी कमाल अनुभूती देऊन जाणं आणि दुसरं तिच्या स्वप्नवत असलेल्या अभिनेत्यासोबत या प्रोजेक्टसाठी काम करणं. अभिनेता सुमित राघवन या प्रोजेक्टमध्ये संस्कृतीच्या कृष्ण रुपासाठी आवाज देणार असल्याचं कळतंय. आणि म्हणून हा प्रोजेक्ट तिच्यासाठी जास्त खास आहे.
संस्कृतीने आजवर अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलंय. त्यामुळे आता तिचा हा कृष्णरुपी अवतार बघण्यासाठी सगळे उत्सुक असतीलच.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
