डॉ. अनोखेलाल सक्सेना या व्यक्तिरेखेशिवाय अॅण्ड टीव्हीवरील ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेचा विचार अशक्यच आहे. दशकापासून अभिनेता सानंद वर्मा याने ही उत्साही व विलक्षण भूमिका साकारली आहे. या भूमिकेला टेलीव्हिजनवरील सर्वात संस्मरणीय व्यक्तिमत्त्व बनवले आहे. मालिकेला ११ वर्ष पूर्ण होत असताना सानंद हास्य, शिकवण आणि चाहत्यांकडून अमाप प्रेमाने भरलेल्या त्याच्या प्रवासाबाबत सांगत आहे.
या यशाबाबत आपले मत व्यक्त करत सानंद वर्मा म्हणतो, ”जवळपास ३००० एपिसोड्सनंतर सक्सेनाजी माझ्यामध्ये सामावून गेला आहे. आता, मला माझे हावभाव किंवा प्रतिक्रियांबाबत विचार करावा लागत नाही, त्या आपोआप येतात. आमच्या मालिकेमधील खरा उत्साहीपणा आमच्या सर्वोत्तम लेखकांकडून येतो, जे सतत नवीन कथानक व संवाद आणतात, जे विनोदाचा स्तर उंचावत ठेवतात. प्रेक्षक आमच्या पात्रांशी संलग्न झाले, ज्यानंतर सर्वकाही सुरळीत होत गेले.”

जुन्या आठवणी सांगताना तो पुढे म्हणतो, ”कॉमेडी संगीतासारखे आहे. टायमिंग महत्त्वाचा आहे. संगीतकार त्यांच्या तालाचा सराव करतात, तसे आम्हाला योग्य ताल आणण्यासाठी पंचलाइन्सची तालीम करावी लागते. कधी-कधी, टोन किंवा क्षणामधील काहीसा बदलही मोठा विनोद घडवून आणू शकतो. प्रत्येक कलाकाराची स्वत:ची लय, स्वत:चे सूर आहेत आणि मी त्याप्रती बांधील राहतो. फक्त एका कलाकाराचा अभिनय पुरेसा नाही तर टीमवर्क महत्त्वाचे आहे. लेखन, टायमिंग व सह-कलाकारांमधील केमिस्ट्री उत्तम कॉमेडीचे आधारस्तंभ आहेत. हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा जादू घडते.”
मजेशीर तथ्याला उजाळा देत सानंद हसत म्हणतो, ”माझे दिग्दर्शक नेहमी म्हणतात की, मी वास्तविक जीवनातही सक्सेना आहे. आम्ही आमच्या कॉर्पोरेट दिवसांपासून एकमेकांना ओळखतो आणि त्याला वाटते की मी पडद्यामागेही विलक्षण आहे. याच कारणामुळे मला ही भूमिका मिळाली असेल. आतापर्यंतचा प्रवास सामान्य, पण अविश्वसनीयरित्या समाधानकारक राहिला आहे आणि मी यापेक्षा अधिक कशाचीच मागणी करू शकत नाही.”
‘भाबीजी घर पर है’ ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता एण्ड टीव्हीवर दाखवली जाते.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
