इन्स्पेक्टर झेंडे – नेटफ्लिक्सवरील चित्रपट | Inspector Zende – Netflix Movie

Inspector Zende Netflix FM

Last updated on September 27th, 2025 at 06:41 pm

ओम राऊत यांच्यासाठी नेटफ्लिक्सवरील चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा केवळ एक क्राईम ड्रामा नाही, तर एक भावनिक प्रवास आहे. लहानपणापासून ते आपले वडील – डॉ. भरतकुमार राऊत – यांच्याकडून इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या शौर्याच्या कथा ऐकत आले आहेत. ह्याच कथा आता त्यांच्या चित्रपटाचा पाया बनल्या आहेत.

सेटवर एक अविस्मरणीय क्षण तेव्हा घडला, जेव्हा खरे इन्स्पेक्टर झेंडे आणि चित्रपटातील झेंडे (मनोज बाजपेयी) यांना भेटले… विशेष म्हणजे ओम राऊत यांचे वडीलही त्या भेटीचा भाग होते.

Inspector Zende Netflix


ओम म्हणतात, “वडिलांच्या या कहाण्या लहानपणापासून आमच्या घराचा भाग राहिल्या आहेत. आज त्यांना हा सन्मान मिळताना पाहणं आणि इन्स्पेक्टर झेंडे यांना प्रत्यक्ष सेटवर पाहणं, माझ्यासाठी आयुष्याचा गोळा पूर्ण झाल्यासारखं आहे.”


मनोज बाजपेयी, जिम सर्भ आणि दमदार कलाकारांसोबत, चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित हा चित्रपट ओम राऊत यांच्यासाठी त्यांच्या वडिलांच्या नायकाला एक सलाम अर्पण करण्याचा आणि त्या परंपरेला जगासमोर आणण्याचा एक मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *