आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लेखन केलंय, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेता सुरेन महापात्रा, अभिनेता उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेश सावंत, अरुण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी स्टारकास्ट आहे.
नावीन्यपूर्ण कथा, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करेल अशी शक्यता आहे. शिवाय या कथेतून मानवी आयुष्याचे वेगवेगळे पदर, भावभावना उलगडण्यात आल्या आहेत.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
