‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार

प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला हा सिनेमा ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या या नव्या पोस्टरमध्ये एक ठाम पाऊल, उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं नाव ‘मर्दिनी’ पाहायला मिळतं.

सामान्य चौकटी मोडत, स्त्रीच्या संयम, संघर्ष आणि आत्मबळाचा ठसा उमटवणारा ‘मर्दिनी’ भावनांना स्पर्श करणारा आणि मनाला प्रश्न विचारायला लावणारा अनुभव देईल असा दिसतोय. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांच्यासोबत बालकलाकार मायरा वैकुळ हिचीही भूमिका आहे.

अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *