अभिनेत्यांमध्ये सर्वात श्रीमंत कोण, अमिताभ बच्चन श्रीमंत की अक्षयकुमार वा शाहरूख श्रीमंत असा वाद नेहमीच घडतो. शाहरूख प्रचंड तालेवार आहे हेही आपण ऐकत आलो आहोत, पण संपत्तीच्या बाबतीत शाहरूखलाही मागे टाकणारा अखेर भेटलाच…

बॉलिवुड इंडस्ट्रीचा सुपरस्टार शाहरुख खान याने आपल्या मेहनतीने नावलौकिक तर कमावलाच, पण पैशांची मायाही रग्गड मिळवली. जगातल्या सात अब्जाधीशांमध्ये तो सामील असल्याचा अभिमानही त्याच्या चाहत्यांनी मिरवला. पण याच शाहरुखला ‘फिजिक्स वाला’चा फाऊंडर अलख पांडे याने संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
‘फिजिक्स वाला’चा फाउंडर अलख पांडे याच्या नेटवर्थमध्ये 223 टक्के वाढ झाली असून, ती 14 हजार 510 कोटी रुपये झाली आहे. येथेच त्याने शाहरूख खानला मागे टाकले. शाहरूखची संपत्ती 12 हजार 490 कोटी रुपये आहे. शाहरुखला मागे टाकल्यामुळे अलख पांडे सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
