संस्कृती बालगुडेचा पहिला शो दुबईत

याबद्दल बोलताना संस्कृती सांगते, “संभवामी युगे युगे” या डान्स ड्रामाचा शुभारंभ आम्ही दुबईमध्ये करतोय. खूप उत्सुकता आहे तेवढी धाकधूकही आहे. कारण परदेशात जाऊन पहिला शो करणं हे आमच्यासाठी खूप खास आहे. दुबईमधला प्रेक्षकवर्ग पहिल्यांदा हा सगळा सोहळा अनुभवणार आहे. “संभवामी युगे युगे”ची एक सुंदर छान सुरुवात व्हावी आणि तीसुद्धा दुबईमध्ये हे आमचं आधीपासून ठरलं होतं. दुबईनंतर भारतात, आपल्या महाराष्ट्रात याचे शो करण्यासाठीही मी तितकीच उत्सुक आहे. कृष्णाला भाषा नसते असं म्हणतात आणि म्हणून परदेशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळा अनुभव देण्याचा विचार असल्याने आम्ही हा पहिला शो परदेशात करण्याचं ठरवलं. “संभवामी युगे युगे” लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच सज्ज आहोत.”

कृष्ण रुपात दिसणारी संस्कृती आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तिच्या या लूकच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय आणि हा खास लुक आणि तिच्या मनाच्या अगदी जवळच्या असलेला हा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी संस्कृतीने सोशल मीडियावर तिच्या या नव्या लुक आणि प्रोजेक्टबद्दल सांगितल होतं. “संभवामी युगे युगे” हा तिचा पहिलावहिला डान्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार असून साता समुद्रापार दुबईमध्ये याचा पहिला शो 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

दिग्गज कलाकार सुमित राघवन यांनी संस्कृती साकारणार असलेल्या कृष्णाच्या भूमिकेसाठी आवाज दिला असून या प्रोजेक्टमध्ये वैविध्यपूर्ण गोष्टीचा मिलाप बघायला मिळणार आहे. कृष्णाच्या रूपाची लिलया आणि किमया लवकरच दुबईमधल्या प्रेक्षकांना मोहित करणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *