श्रेयस प्रार्थनाचा ‘मर्दिनी’ नव्या वर्षात!!

श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणी घेऊन ‘मर्दिनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रे‌यस तळपदेच्या या चित्रपटाची कथा मनोरंजनाच्या पलीकडे, प्रत्येक स्त्रीच्या सामथ्यार्ची, सहनशक्तीची आणि शक्तीची गाथा उलगडते.

प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते. वेळ आली की रूप दाखवते. या चित्रपटात सुंदर आणि चमकदार कलाकारांचा संगम आहे, ज्यांच्या कामगिरीमुळे कथा अधिक प्रभावी आणि आठवणींमध्ये राहणारी बनेल. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांच्यासह यात बालकलाकार मायरा वैकुळ हिचीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट आशय, अभिनय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने एक वेगळा आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देऊ शकतो. अजय मयेकर यांचे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होतेय. ‘मर्दिनी’ चित्रपट येत्या २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *