सासरी व माहेरी दोन्हीकडे गणपती – अभिनेत्री शिवानी सोनार | गणपती विशेष कॉलम

Shivani Sonar 2025 FM

Last updated on September 27th, 2025 at 06:42 pm

Shivani Sonar 2025

वर्षातील ३६५ दिवसांपैकी गणपती उत्सवाचे जे १० दिवस असतात, ते माझ्यासाठी खूप खास असतात. या वर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खास आहे, कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला गणेशोत्सव आहे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती असतो, पण माझ्या सासरी इतकी वर्षं, दीड दिवसाचा गणपती असायचा, पण या वर्षांपासून माझ्या सासूबाईंनी ठरवले आहे की आपण पाच दिवसांचा गणपती ठेवायचा. माहेरी आणि सासरी दोन्हींकडे गणपती असणार आहे, तर तारांबळ उडणार आहे. पण बाप्पाच्या आशीर्वादाने कधी काम थांबलं नाही. मी दरवर्षी मानाच्या पाच गणपतीचे दर्शन घेतेच. मला बाप्पाची आरास करायला प्रचंड आवडते. गणेशोत्सवात जे वातावरण असतं ते खूप छान वाटतं.

– शिवानी सोनार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *