‘कंतारा’चा प्रीक्वल येताच पहिल्या भागावर उड्या

कोरोना काळात ओटीटीवर लोक तुटून पडले होते. ओटीटीची ती लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी ‘कंतारा’ हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आणि गेला. मग तो ओटीटीवरही आला. आतापर्यंत त्या सिनेमाकडे कुणी ढुंकूनही पाहात नव्हते. पण गेल्याच शुक्रवारी त्याचा सिक्वल ‘कंतारा चॅप्टर 1’ प्रदर्शित झाला आणि ओटीटीवरील ‘कंतारा’ सिनेमावर प्रक्षकांच्या उड्या पडायला लागल्या. सिक्वल आणि खास करून त्याचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक चक्रावले आहेत. दोन तास आणि 27 मिनिटांचा पहिला भाग पाहूनही माणूस गरगरल्याशिवाय राहणार नाही.
तीनेक वर्षांपूर्वी ‘कंतारा’ हा सिनेमा केवळ 16 कोटींमध्ये बनला होता. पण आतापर्यंत जगभर त्या सिनेमाने 400 कोटींहून जास्त बिझनेस केला आहे.
‘कांतारा’ या सिनेमात ऋषभ शेट्टी लीड रोलमध्ये आहे. कथानक एका विराट जंगलातून सुरू होते. तेथे जंगली लोक वर्षानुवर्षे राहात आहेत. काही जमीनदार हे जंगल बळकावून तेथे इमारतींचे जंगल उभारू पाहात आहेत, पण जंगली लोक याला कडाडून विरोध करतात. कारण येथे त्यांची देवता राहात आहे असा त्यांचा समज आहे. प्रशासन आणि जंगली लोक यांचा हा संघर्ष विकोपाला जातो. या सिनेमाचा शेवटही श्वास रोखणारा झाला होता. एमेझोन प्राईमवर हा सिनेमा मूळ भाषेत, तर नेटफ्लिक्सवर तो हिंदीत पाहायला मिळतो.
या सिनेमाचा सिक्वल (सिक्वलपेक्षा प्रीक्वल म्हणणं योग्य ठरेल) ‘कांतारा चॅप्टर वन’ आता आला आहे. हा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण हा सिनेमा पाहण्याआधी त्याचा आधीचा भाग जरूर पाहून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *