रिलीजपूर्वीच ‘नॅचरल स्टार’ नानी स्टारर ‘द पॅराडाईज’ चित्रपटाची उत्सुकता सातव्या आसमानावर पोहोचली आहे. चित्रपटाच्या टीझरसोबतच ‘आया शेर’ आणि ‘येशानागुला’ यांसारख्या गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे ‘द पॅराडाईज’ने प्रेक्षकांसह संगीतप्रेमींचीही मने जिंकली आहेत.
‘नॅचरल स्टार’ नानी स्टारर ‘द पॅराडाईज’ हा यंदाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले असून, यापूर्वी या सुपरहिट अभिनेता-दिग्दर्शकाच्या जोडीने ‘दसरा’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी टीझर आणि गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटाच्या रिलीजसाठी आधीच वातावरण निर्मिती केली आहे. दमदार कथानकासोबतच नानीचा अनोखा लूक आणि त्यांची व्यक्तिरेखा यामुळेही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपटाच्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढताना दिसत आहे. चित्रपटाच्या दमदार कलाकारांच्या यादीत नॅचरल स्टार नानी, राघव जुयाल (खलनायक), सोनाली कुलकर्णी आणि कायडू लोहार यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य प्री-रिलीज प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कलाकारांची एकत्रित उपस्थिती चित्रपटाच्या रिलीजपूर्वीचा उत्साह आणखी वाढवणार आहे.
आतापर्यंत रिलीज झालेल्या टीझरमध्ये नानी यांचा आतापर्यंतचा सर्वात इंटेन्स आणि बेधडक अवतार पाहायला मिळत आहे. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात नानी यांनी जदल ही व्यक्तिरेखा साकारली आहे, जो एका वेश्येचा मुलगा आहे. दमदार कथानकासह हा चित्रपट प्रेक्षकांसमोर नानी यांचा वेगळा अवतार सादरण्याबरोबरच रॉ इंटेन्सिटी, मास एनर्जी आणि हाय-ऑक्टेन अॅक्शनचा अनुभव देण्याचे आश्वासन देताना दिसत आहे. दुसरीकडे, ‘द पॅराडाईज’मध्ये राघव जुयाल एका खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या रंजक विश्वात आणखी एक थर जोडते.
याशिवाय, ‘द पॅराडाईज’ची गाणी नवे मानदंड प्रस्थापित करत असतानाच विक्रमही मोडत आहेत. चित्रपटातील पहिले गाणे ‘आया शेर’ने यूट्यूबवर २०० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि १.८ मिलियनहून अधिक लाइक्स मिळवले आहेत. तसेच हजारो इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून हे गाणे सोशल मीडियावरही लोकप्रिय ठरले आहे. दुसरीकडे, ‘येशानागुला’ या दुसऱ्या गाण्यानेही यूट्यूबवर ११९ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि ७००K लाइक्सचा टप्पा पार केला आहे. ही दोन्ही गाणी विविध चार्ट्स आणि प्लॅटफॉर्म्सवर लोकप्रिय ठरत असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता यावरून स्पष्ट होत आहे.
SLV सिनेमाजच्या निर्मितीखाली तयार झालेला ‘द पॅराडाईज’ २४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ भाषांमध्ये मोठ्या स्तरावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची जागतिक पातळी लक्षात घेता, निर्मात्यांनी कथितरित्या हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी ‘द पॅराडाईज’ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर करण्यासाठी संपर्क साधला आहे. दमदार दिग्दर्शक, प्रभावी स्टारकास्ट आणि ग्लोबल स्केलसह ‘द पॅराडाईज’ केवळ एक चित्रपट न राहता एका मोठ्या सांस्कृतिक पर्वाचे रूप घेताना दिसत आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
