‘मायसा’च्या निर्मात्यांनी बहुप्रतीक्षित टीझर रिलीज केला असून, यात रश्मिका मंदाना आजवर कधीही न पाहिलेल्या आणि एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. भारतातील पहिला महिला-केंद्रित पॅन-इंडिया सिनेमॅटिक प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अॅक्शन ड्रामाचा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

२०२६ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘मायसा’मध्ये पॅन-इंडिया स्टार रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाणारी रश्मिका या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या एका अनोख्या आणि पूर्णपणे वेगळ्या अवताराची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. आकर्षक पोस्टर्स आणि रंजक कंटेंटमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर, निर्मात्यांनी आता अॅक्शनने भरलेला बहुप्रतीक्षित टीझर रिलीज केला आहे.
टीझरमध्ये रश्मिका एका आक्रमक, रफ-टफ आणि संतप्त अंदाजात दिसत असून, तिचा हा अवतार प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. हाय-ऑक्टेन अॅक्शनने भरलेला हा टीझर चित्रपटाच्या मध्यवर्ती कथेचीही झलक देतो—एका वडील आणि मुलीच्या अतूट नात्याची ही भावनिक कथा आहे. ‘मायसा’मध्ये वडील-मुलीचे नाते एका वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. भावना, अॅक्शन आणि भव्य दृश्यांचा सुरेख मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ही एक महत्त्वाकांक्षी महिला-केंद्रित अॅक्शन फिल्म असून, रश्मिका या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
‘सीता रामम’मधील आपल्या प्रशंसनीय कामासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रविंद्र पुल्ले यांनी या चित्रपटात अॅक्शन, भावना आणि भव्यतेचा सुंदर मिलाफ साधला आहे. रश्मिकाला केंद्रस्थानी ठेवत चित्रपटात एक रंजक आणि वेगळी दुनिया उभी करण्यात आली आहे. टीझरमधून मोठ्या प्रमाणावर साकारण्यात आलेल्या एका भव्य पॅन-इंडिया सिनेमॅटिक अनुभवाची झलक पाहायला मिळते. यात रश्मिका आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड नव्या अवताराने प्रभाव पाडताना दिसत आहे. प्रसिद्ध संगीतकार जेक्स बेजॉय यांच्या दमदार संगीतामुळे चित्रपटाची तीव्रता आणखी वाढते. त्यांचा इंटेन्स म्युझिक स्कोअर टीझरमधील ऊर्जा आणि ड्रामाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.
अनफॉर्मुला फिल्म्स निर्मित आणि रविंद्र पुल्ले दिग्दर्शित ‘मायसा’ हा आदिवासी प्रदेशांच्या पार्श्वभूमीवर आधारित भावनिक अॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात भव्य व्हिज्युअल्स, रोमांचक कथा आणि रश्मिका मंदानाचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. ‘मायसा’ २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
