प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या तीन कथांवर आधारित ‘महोगाथा’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे.
सावित्री मेधातुल यांनी हे नाटक लिहिले असून, या नाटकाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. मंगेश सातपुते यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल हे चार कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा सुमित पाटील यांची आहे. विक्रम होता यांनी या नाटकाला संगीत दिले असून, विलास हुमणे यांनी प्रकाशयोजना केली आहे. ‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स’ या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.

सध्याच्या काळात सभोवती घडत असलेल्या विविध घटनांना प्रतिसाद, अशा स्वरूपाचे हे नाटक आहे. या नाटकाचा फॉर्म थोडा वेगळा आहे. हे नाटक रंगभूमीवर तर केले जाणारच आहे, पण त्या व्यतिरिक्तही उपलब्ध जागेत हे नाटक सादर करता येऊ शकते, अशी या नाटकाची रचना आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
