राहिल आजमच्या ‘शिद्दत’चे अनावरण

टेलीविजन अभिनेता राहिल आजम याने ‘शिद्दत : स्ट्रेंथ ऑफ इमोशन’ या आपल्या म्युझिक अल्बमच्या अनावरणासह आता कॅमेऱ्यामागे पाऊल ठेवले आहे. अभिनय तो करत होताच, आता तो लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि संकलक म्हणून लोकांसमोर आला आहे. या लॉन्च सोहळ्याला रूपाली गांगुली, राजू खेर, गुल्की जोशी, हुनर ​​हाली, जसवीर कौर, वाहबिज दोराबजी, दलजीत कौर, मनीष नागदेव, मज़हर सैयद, अद्रिजा रॉय, शिवम खजुरिया, इशिका शाही, झलक देसाई, शिवानी चक्रवर्ती, सिद्धांत इस्सर, विकास वर्मा, सत्य तिवारी, जतिन सुरी, कृतिका देसाई, भावना अनेजा, निकिता, राहुल शर्मा, अभय जाधव, विवेक जैन, रोमेश कालरा, प्रियंका सिबल, सिद्धार्थ सिबल, रश्मि आर्या, फैसल मिया, हर्षा, तशी शर्मा ग्रेवाल, विभा आनंद, मृदुला कंवर, प्रतीची महापात्रा, विक्रम घई हेही आवर्जून हजर राहिले होते. या सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

त्याचे स्वत:चे बॅनर असलेल्या ‘विजन ऑफ पॅशन’ अंतर्गत त्याने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. यात त्याच्यासोबत प्रीति चौधरी दिसणार आहे. यात संगीत, गीत आणि संवाद विनय राज सक्सेना यांचे आहेत, तर हा प्रोजेक्ट के प्राशी डिजीटलने डिस्ट्रीब्यूट केला आहे.

राहिल गेल्या दोन दशकांपासून टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहे. ‘शिद्दत’ची संकल्पना बरीच वर्षे त्याच्या मनात होती. अखेर त्याचे स्वप्न पूर्ण झाले. तो म्हणतो, “मी स्वत:ला नेहमीच अशा पद्धतीने सादर करायचा विचार करत होतो. आजवर कुणीच ते केले नाही. सर्वच क्षेत्रात मला काम करायचे होते, मग ते संकलन का असेना… असेही त्याने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *