मनोरंजनाची नवी व्याख्या मांडणार ‘नखरेवाली’

नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव यांचा ‘नखरेवाली’ हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी या चित्रपटाला एक नवा दृष्टिकोन देण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या हटके आणि रंजक विश्वाची झलक दाखवणाऱ्या पोस्टरवर “कभी कभी प्यार में मजनू को भी लैला बनना पड़ता है” ही ओळ पाहायला मिळते. जी प्रेमाच्या नात्यातील पारंपरिक भूमिका उलटवणारी आणि स्त्री-पुरुषांच्या नात्यांकडे एका नव्या नजरेतून पाहण्याचा संकेत देते.

राहुल शंकल्या यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. पारंपरिक रोमँटिक कॉमेडीपेक्षा वेगळा ‘वॉमँटिक कॉमेडी’ हा अनोखा अंदाज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विनोद, भावनिक नातेसंबंध आणि आजच्या काळातील विचार यांची सांगड घालत हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि स्त्री-पुरुष समानतेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहतो.

हलकीफुलकी आणि मनोरंजक मांडणी करत ‘नखरेवाली’ महिला सुरक्षा आणि समाजात खोलवर रुजलेल्या पारंपरिक विचारांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. मनोरंजनासोबतच , सामाजिक विषयांवर विचार करायला लावणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातून चित्रपटाच्या अनोख्या कथानकाची आणि प्रेमाकडे पाहण्याच्या हटके दृष्टिकोनाची झलक पाहायला मिळेल.

आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांच्या नेतृत्वाखालील जिओ स्टुडिओज आणि कलर यलो यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘नखरेवाली’ हा चित्रपट वेगळ्या धाटणीच्या, आपल्या मातीत रुजलेल्या कथा आणि नवे विचार प्रेक्षकांसमोर आणण्याची या निर्मिती संस्थांची परंपरा पुढे नेतो. हा चित्रपट ३० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *