मुंबई : मुंबईकरांना यंदा नवरात्रीच्या निमित्ताने संगीत, गरबा, दांडिया आणि उत्साहाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘दिव्य रास नवरात्री २०२६’चा दुसरा पर्व ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत इनऑर्बिट, मलाड येथे रंगणार आहे.
कॅम्पा प्रस्तुत या दहा दिवसीय महोत्सवाचे आयोजन रुद्र-अक्षर एंटरटेनमेंट्स अँड हॉलिडेज आणि इव्हेंट्री यांच्या वतीने करण्यात आले असून, संकल्प एंटरटेनमेंट आणि हार्डीबॉइझ पार्टीकिंग यांच्या भागीदारीत हा उत्सव साकारला जात आहे. पारंपरिक नवरात्रीच्या उत्सवाला आधुनिक आणि तरुणाईला आकर्षित करणाऱ्या स्वरूपाची जोड देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध गायिका जोडी प्रीती-पिंकी यांचे लाइव्ह सादरीकरण असणार आहे. दमदार आवाज आणि उत्साहपूर्ण सादरीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रीती-पिंकी यांच्या उपस्थितीमुळे गरबा आणि दांडियाच्या जल्लोषात आणखी रंगत भरली जाणार आहे.
या महोत्सवाबाबत प्रीती-पिंकी म्हणाल्या, “नवरात्री हा उत्सव आमच्या मनाच्या अतिशय जवळचा आहे. संगीत, नृत्य आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यात एक वेगळीच ऊर्जा असते. ‘दिव्य रास नवरात्री २०२६’शी जोडले जाण्याचा आम्हाला आनंद आहे. इनऑर्बिट, मालाड येथे हे दहा दिवस ऊर्जा, आनंद आणि गरब्याने भरून टाकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर वरुण बारोट आणि रुतिका मालविया यांच्या नेतृत्वाखालील हार्डीबॉइझ पार्टीकिंग यंदाही ‘दिव्य रास’सोबत जोडले गेले आहे. यंदा संकल्प एंटरटेनमेंट आणि हार्डीबॉइझ पार्टीकिंग यांच्या भागीदारीमुळे महोत्सवाचा विस्तार करण्यात आला आहे. ‘संकल्प फाल्गुनी दांडिया’चे संस्थापक देवेंद्र जोशी हे नवरात्री आणि दांडियाच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
या भागीदारीबाबत देवेंद्र जोशी म्हणाले, “आजचा प्रेक्षक तरुण आहे आणि त्याच्या आवडीनिवडी बदलत आहेत. आमच्या प्रदीर्घ अनुभवातून या पिढीची पसंती समजून घेत, पुढच्या पिढीला पुढे आणणे आणि त्यांना उत्सवाची निर्मिती व नेतृत्व करण्याची संधी देणे गरजेचे आहे. ‘दिव्य रास’च्या माध्यमातून अनुभव आणि नवी ऊर्जा यांचा संगम घडवण्याची संधी मिळत आहे.”

या महोत्सवाला जितेंद्र मोटवानी, नितीन नायक, शालिनी गुप्ता, सीए आशीष बकलीवाल आणि शिवशंकर अग्रवाल यांच्या समावेश असलेल्या आयोजन समितीचे सहकार्य लाभत आहे. महोत्सवाच्या व्यवस्थापनाची धुरा सागर भाटिया आणि आशीष घेलानी सांभाळत असून, वरुण बारोट, रुतिका मालविया आणि सुहास शहाणे हे भागीदार म्हणून सहभागी आहेत.
सागर भाटिया आणि आशीष घेलानी म्हणाले, “नवरात्री हा संगीत, नृत्य आणि भक्तीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. ‘दिव्य रास’च्या माध्यमातून नवरात्रीची पारंपरिक भावना जपत प्रेक्षकांना उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. इनऑर्बिट, मालाड येथे दहा दिवसांचा हा उत्सव आयोजित करताना आम्हाला आनंद होत असून मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आम्ही आवाहन करतो.”
रुद्र-अक्षर एंटरटेनमेंट्स अँड हॉलिडेज आणि इव्हेंट्री यांच्या आयोजनातून, कॅम्पा प्रस्तुत भागीदार म्हणून आणि संकल्प एंटरटेनमेंट व हार्डीबॉइझ पार्टीकिंग यांच्या भागीदारीत साकारला जाणारा ‘दिव्य रास नवरात्री २०२६’ हा संगीत, गरबा, दांडिया आणि सामुदायिक उत्सवाचा संगम ठरणार आहे. ‘दिव्य रास नवरात्री २०२६’ हा महोत्सव ११ ते २० ऑक्टोबर २०२६, इनऑर्बिट, मालाड, मुंबई.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
