अक्षया नाईक आता नव्या रूपात…!

२०२५ वर्षात नेटफ्लिक्सवरून बॉलिवूड आणि ओटीटी पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. आपल्या अभिनयाने बॉलिवुड प्रेक्षकांना मोहित करणारी हीच अभिनेत्री आता पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. “संतांची बोली, विठ्ठ्लाची गोडी” या किर्तन विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा ती सांभाळताना दिसणार आहे. स्टार प्रवाह पिक्चरनंतर कलर्स मराठीवरहा याचे टेलिकास्ट होणार असून प्रेक्षकांची लाडकी सुंदरा पुन्हा एकदा मन जिंकणार यात शंका नाही.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना अक्षया सांगते, संतांची वाणी, कीर्तन, अभंग या सगळ्यांशी गेल्या २-अडीच वर्षात संबंध कसा आणि कधी वाढला कळलंच नाही. या ना त्या कारणाने मी विठ्ठलाच्या जवळ गेले. २०२४ मध्ये “वारसा कीर्तनाचा” या कार्यक्रमाचं निवेदन करायला मिळालं, तेव्हा नव्याने विठ्ठलाशी जोडले गेले आणि तेव्हापासून त्याने माझी साथ सोडली नाहीये. माझा सर्वात आवडता बॅण्डसुद्धा “अभंग रिपोस्ट” आहे. कीर्तन कला ही महाराष्ट्राला लाभलेली देणगी लोकांपर्यंत माझ्या कलेतून पोहचवता येतेय, यापेक्षा जास्त आनंद नाही.

“संतांची बोली, विठ्ठलाची गोडी”च्या ३० एपिसोडचे सूत्रसंचालनाच्या लिंक शूट आम्ही एका दिवसात केलं आणि म्हणून अशा शूटची गंमत ही काही वेगळीच होती, असंही ती म्हणाली. येणाऱ्या काळातही सगळ्यांची लाडकी सुंदरा लवकरच नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसणार असल्याचं कळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *