Last updated on September 27th, 2025 at 06:42 pm
‘तारिणी’ मालिकेतील तारिणी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार आपलं शूट संपवून पुण्याला पोहचली आहे. लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा करायला… तिने आपले मन मोकळे केले.

वर्षातील ३६५ दिवसांपैकी गणपती उत्सवाचे जे १० दिवस असतात, ते माझ्यासाठी खूप खास असतात. या वर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खास आहे, कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला गणेशोत्सव आहे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती असतो, पण माझ्या सासरी इतकी वर्षं, दीड दिवसाचा गणपती असायचा, पण या वर्षांपासून माझ्या सासूबाईंनी ठरवले आहे की आपण पाच दिवसांचा गणपती ठेवायचा. माहेरी आणि सासरी दोन्हींकडे गणपती असणार आहे, तर तारांबळ उडणार आहे. पण बाप्पाच्या आशीर्वादाने कधी काम थांबलं नाही. मी दरवर्षी मानाच्या पाच गणपतीचे दर्शन घेतेच. मला बाप्पाची आरास करायला प्रचंड आवडते. गणेशोत्सवात जे वातावरण असतं ते खूप छान वाटतं.
– शिवानी सोनार

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
