‘सुभेदार गेस्ट हाऊस’ नाटकाचा थरार…

सस्पेन्स-थ्रिलर या प्रकारात मोडणाऱ्या ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या मराठी नाटकाचा थरार सध्या रंगभूमीवर रसिकांना अनुभवण्यास मिळत आहे. प्रख्यात लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘माऊस ट्रॅप’ या प्रसिद्ध नाटकावर आधारित ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे मराठी नाटक रंगभूमीवर आले आहे.

‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून, दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे, तर अजित परब यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना केली आहे. 

शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत.

‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे प्रयोग सध्या मोठ्या धडाक्यात रंगभूमीवर सुरू आहेत. उत्तम मनोरंजन करणारे हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले असून, थरारक अनुभव रसिकांना या नाटकाच्या माध्यमातून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *