तरुणाईच्या पसंतीस उतरलेला “भेटली तू पुन्हा” हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. “भेटली तू पुन्हा 2” लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहे.

“भेटली तू पुन्हा” या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हेच या चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार असून लेखन संजय जमखंडी यांचे आहे. या चित्रपटाचा सिक्वल येतो आहे हे माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हलकी फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत, उत्तम अभिनय यामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या भागाला छान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वलमुळे कथानक काय वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
