सुरेंद्र मोहन पाठक यांच्या ‘द विमल सिरीज’ या गाजलेल्या कलाकृतीत हिंदी साहित्यातील सर्वात चिरस्थायी पात्रांपैकी विमल खन्ना हे एक पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या मालिकेत ईशा तलवार आणि तारा अलीशा बेरी यांच्यासोबत सनी हिंदुजा मुख्य भूमिकेत झळकत आहे. 15 मे रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका एका तणावपूर्ण, अनपेक्षित जगात प्रवेश करते जिथे ओळख नाजूक असते, विश्वास धोकादायक असतो आणि प्रत्येक हालचालीची किंमत मोजावी लागते.

स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना सनी हिंदुजा म्हणाला, “अॅमेझॉन एमएक्स प्लेयरसोबत विमल खन्नावर काम करण्याचा हा एक विलक्षण अनुभव होता. विमल हा पारंपरिक नायक नाही; तो एक सामान्य माणूस आहे, ज्याला विलक्षण परिस्थितीत ढकलले जाते, जिथे जगणे ही सहज प्रवृत्ती बनते. ज्या गोष्टीने मला या पात्राकडे आकर्षित केले ते म्हणजे त्याचा अंतर्गत संघर्ष, त्याची ओळख टिकवून ठेवणे आणि त्याच्या विरोधात काम करणाऱ्या व्यवस्थेशी जुळवून घेणे यांच्यातील सततचा संघर्ष. ‘ये अलग मिट्टी का बना है’ ही एक म्हण विमलला तंतोतंत लागू पडते. त्याचा प्रवासच त्याला असुरक्षित आणि शक्तिशाली बनवतो.”
कथालेखक सुरेंद्र मोहन पाठक म्हणाले, “विमल खन्ना हे पात्र वर्षानुवर्षे वाचकांच्या स्मरणात आहे. त्यांचा प्रवास नेहमीच स्वत:ची ओळख आणि स्वतःच्या भावनेला आव्हान देणारा आहे जो. ही कथा पडद्यावर आकार घेताना पाहणे रोमांचक आणि अर्थपूर्ण दोन्ही आहे. प्रेक्षक कधी एकदा अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या माध्यमातून नवीन पद्धतीने या विश्वाचा अनुभव घेतील असं झाले आहे.” विमल खन्नाचे स्ट्रीम मोफत खास अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर 15 मेपासून सुरू झाले आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
