सुलू आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?

‘दीपज्योती’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचा वेगवान प्रवास, कलाकारांचा सहज अभिनय आणि गुंतवून ठेवणारी पटकथा यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे. प्रेक्षकांमध्ये यापुढील कथानकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येणाऱ्या आठवड्यांमध्ये ही मालिका एका अत्यंत मनोरंजक आणि भावनिक वळणावर येणार आहे. जिथे नात्यांची नवी परीक्षा आणि संघर्षाची ठिणगी पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या आगामी भागात, दीप आणि ज्योती यांच्यातील अनोखं नातं एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. ज्योतीचं रक्षण करण्यासाठी दीप चक्क वेशांतर करून येणार आहे. दीपाचे हे वागणे ज्योतीला बेजबाबदारपणाचे वाटून त्यांच्यात वादाची ठिणगी पडणार आहे. दुसरीकडे, स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच, ज्योती स्वराजची ‘वर चाचणी’ घेणार आहे. तर सुलू आत्या प्रीतीची ‘वधू चाचणी’ घेणार आहे. आता ही वधू-वर चाचणी काय असेल हे बघणं औसुक्याचं असेल. तणावपूर्ण वातावरणात साखरपुड्याची बोलणी सुरू होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *